संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर उद्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची मागणी करत आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाच मोठी वाढ होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सातवा वेतन आयोग लागू होऊन जवळपास 8 वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता सातवा वेतन आयोग संपणार का? नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा होणार? नवीन नवीन फॉर्म्युला आणला जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुढील वर्षी देशाच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सरकार कर्मचाऱ्यांना खूश करण्याच्या विचारात आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी पूर्ण अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा सरकार करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सातवा वेतन आयोग लागू होऊन जवळपास 8 वर्षे झाली आहेत आणि 2024 हे वर्ष नवीन वेतन आयोग स्थापन होण्याची वेळ आहे. अर्थसंकल्पात पगारवाढीचा नवा फॉर्म्युला जाहीर केला जाण्याचीही शक्यता आहे.
खासगी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांनाही चांगली वेतनवाढ देण्याचा सरकारचा मानस आहे. सरकारची एक समिती यावर विचार करत आहे. अशा परिस्थितीत सरकार अर्थसंकल्पात यासंबंधी कोणतीही घोषणा करू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.