अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी संसदेत एक दस्तऐवज सादर केला जातो, ज्याला आर्थिक सर्वेक्षण म्हणतात. ते आज 31 जानेवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील.
हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, कारण त्यात मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षासाठीच्या सूचना, आव्हाने आणि उपाय यांचा उल्लेख आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी अहवाल संसदेत मांडल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील.
आर्थिक सर्वेक्षणात, सरकार आपल्या वित्तीय विकासाविषयी तसेच आर्थिक व्यवस्थापना बद्दल सांगते. सरकारच्या धोरणांचे आणि योजनांचे काय परिणाम झाले आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला, याचीही माहिती त्यात असते.
देशाचे पहिले आर्थिक सर्वेक्षण 1950-51 मध्ये सादर करण्यात आले. सन 1964 पर्यंत देशाच्या सामान्य अर्थसंकल्पासोबत आर्थिक सर्वेक्षण सादर केले जात होते, परंतु नंतर ते अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सादर केले जाऊ लागले.
Published on : 31 January 2023 at 9:40 am