बेंगरुळातून राजमाता जिजाऊ आणि शिवबा आपल्या कुटुंब कबिल्या सह ओसाड पडलेल्या पुणे प्रांतात वस्तीला आले होते, मुरार जगदेवाने बेचिराख केलेलं पुणे, उलटी पहार आणि त्यावर चामड्याचे तुटकी वहाण टांगलेल पुणे पुन्हा एकदा वसवायचे होते, काळ तसा धामधुमीचा होता, स्वराज्य उभं करावं की अन्य काही मनस्थिती नव्हती, शिवबा समोर चार पर्याय होते,क्रमांक एक शहाजी राजांसारखं कधी विजापूर तर कधी अहमदनगर शाही कडे जहागिरी करणे,क्रमांक दोन पुणे सुपे चाकण इंदापूर ही शहाजी राजांची जहागिरी गुमान पणे सांभाळणे, क्रमांक चार शहाजी राजे आणि शहाजहांन याची दोस्ती जगाला ठाऊक होती, शहाजहान ला सांगून मोगली फौजेत हुद्दा मिळवणे, क्रमांक चार हातात काही भांडवल नसताना पैसे नाही, अडका नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, सैनिक नाही, गड नाही की किल्ले नाही, कोट नाही की गढी नाही, स्वतःच्या पराक्रमाने , स्वकर्तीत्वाने जगाच्या पाठीवर आपले स्वतःचे साम्राज्य उभे करणे, राजांनी बापाच्या नावाने कुठेही व्यवहार केला नाही की बापच नाव कुठं वापरलं नाही,सारे विश्व साक्षीदार आहे, राजांनी जे उभं केलं ते अद्वितीय उभं केलं ,राजे सांगतात लोकांचा गुलाम होण्यापेक्षा स्वतःचे छोटे का होईना अस्तित्व निर्माण करा, आमच्या तरुणाईने जर का एवढेच ध्यानी घेतले की भांडवल नसेल तरी चालेल पण जिद्द कायम असली पाहिजे, रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताच्या अभिषेक करून राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असे म्हणत स्वराज्य उभे करता येई, मग व्यवसाय उभा रहावा, असा संकल्प घेऊन मराठी तरुणाला उभे राहता येईल का हेच तर आम्हाला थोरलं राज सांगून गेलय.


राजांनी गडकोट किल्ले घ्यायला सुरवात केली ,स्वराज्य तोरण तोरणा किल्ला घेऊन बांधलं मावळे ते कितिशे होते,शास्त्र देखील तुटपुंजी होती पण जिद्द मात्र प्रचंड होती ,आस होती स्वातंत्र्याची, स्वतःच्या राज्याची स्वराज्याची, हाताशी जे काही भांडवल असेल त्या भांडवला निशी भांडायचे आणि हे ठरले की फक्त विजय मिळवायचा,तोरणा घेतला बोटावर मोजण्याइतका,प्रतापगडाची स्वारी केली ,अफजलला फाडले फक्त 10 मावळ्यांनीशि,कोंडणां घेतला तीनशे मावळ्यांनिशी, पन्हाळा घेतला 60 मावळ्यांनी,लाल महालात स्वारी केली आणि विजयी झाले एकही मावळ्याची हानी न होता, आपण देखील असेच वागले पाहिजे हाताशी जे काही आहे त्याचा फायदा घेऊन आणि स्वतःचे काही नुकसान होणार नाही याची काळजी घेत,आपण यशाच्या मार्गावर चालते झाले पाहिजे, शिवरायांच्या विचार हा लिहिण्या ऐकण्याचा न होता तो जगण्याचा झाला पाहिजे, जेजुरीच्या गडावरती शहाजी राजे आणि शिवराय यांची बहुत दिवसांनी भेट झाली ,राजांनी आबासाहेबाचे जोडे मस्तकी धारण केले,विजापूरच्या दरबारात शहाजीराजांना कैद झाली, स्वराज्य कुठे आता बाळसं लागलं होतं, त्यावेळी शहजहानशि मसलत करून राजकारण करून शहाजीराजांची सुटका करायला भाग पाडले होते,पितृभक्तीचे हे उत्तम उदाहरण आहे, आज आमची तरुणाई काय करीत आहे याचा विचार झाला पाहिजे, राजांचा नावांचा जयघोष करतो आहोत आणि आपणच आपल्या बापाची मानहानी देखील करतो आहोत ,मातृभक्तीच उदाहरण काय सांगावं, स्वराज्यच मुळात आईच्या इच्छेखातर उभं राहिलं आहे,काय।करायचं आणि काय नाही करायच हे राजांनी आपल्याला बालपणापासून दाखवून दिले आहे,परंतु आम्ही ते आत्मसात करायला कमी पडलो आहोत, राजांनी कुठे लिहून ठेवले नाही पण आपल्या वागण्यातून ते सिद्ध केले,राजे रयतेला हे करा असे काही सांगत नव्हते रयत स्वतः ती सगळं स्वीकारत होती आपणहून, म्हणून स्वराज्य होते आजही आम्हाला स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक कळेना झालाय म्हणून आमची ही अवस्था झाली, शेवटी आमचे राष्ट्रीय त्व अबाधित राहील तर आमची ओळख जगाचा पाठीवर राहील जशि आजही शिवरायांच्या नावाची जादू आहे.
साभार (रवींद्र पाटील, इतिहास संशोधक-जळगाव)