प्रत्येक व्यक्तीचां जन्म हा एका इच्छित कार्यासाठी झालेला असतो.छत्रपती शिवरायांच्या जन्म मुळात राष्ट्र निर्मिती झालेला होता.असा योग एकदाच आलेला होतं.प्रभू रामचंद्राच्या जन्म झाला त्याचं वेळी हनुमान,सुग्रीव,अंगद, नल नील,शबरी, केवट,जन्माला आले होते.तसेच शिव जन्मानंतर बाजी,रामजी, येसाजी, तानाजी, मुरारबाजी,बहिर्जी,नेताजी,हांबिर,आणि कुडतोजी जन्माला आले होते.धर्माचे अधिष्ठान जेव्हा पुन्हा प्रस्थापित करावे लागते तेव्हा अश्या विभूती जन्माला याव्याच लागतात.अन्यथा शेकडो वर्षांची काळरात्र पुन्हा नशिबी यावी लागते.साम्राज्य यवनाचे असो की असुरांचे त्यांचा निःपात व्हावाच लागतो.हिंदू राष्ट्राची संकल्पना साडेसात हजार वर्षांनंतर जर कुणी पुन्हा प्रस्थापित केली असेल तर ते एकमेव नाव म्हणजे शिवराय होय.आप्तस्वकीयांना धूळ चारत घोरपडे, सुर्वे, शिर्के, यांना दूर सरत सामान्य मावळ्यांच्या मनात स्वाभिमान आणि पराक्रम पेरत एक हर हर महादेव नावाचा मुखात मंत्र देत.भूतो न भविष्य तो आहे अद्भुत कार्य करण्यास प्रेरित केले.आणि पाहता पाहता समस्त जगाला १६५९ नंतर शिवराय नावाची महती कळून आली.एकाच पराक्रमाने राजे अवघ्या विश्वात जावून पोहोचले.आणि त्या पराक्रमाचे सातत्य कायम ठेवत.राजे छत्रपती झाले .ज्यांनी आम्हाला जगायला शिकवलं, स्वाभिमान शिकवला, न्याय निती आदर्श शिकवले त्या नरसिंहाच्या जन्माचा सोहळा आमच्यासाठी उत्सवापेक्षा कमी असूच शकत नाही.


रायगडावर छत्रपती शिवराय नावच एक वादळ आपल्या कार्यकर्तृत्वाने जगाच्या पाठीवरती,सूर्य चंद्र ताऱ्याच्या साक्षीने, पाच पातशहाच्या नाकावर टिच्चून वयाच्या 14 व्या वर्षांपासून ते 44 वर्षापर्यंत 30 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सोन्याच्या सीहासनावर अधिष्ठित झाले होते. शिवराय जाणते राजे होते, प्रजाधिष्ठित राजे होते तसेच ती रयत देखील राजाधिष्टीत प्रजा होती , परमेश्वरालाही जे निर्णय घेणे कठीण होते ते राजांनी लीलया घेतले होते, त्या अगोदर आणि नंतर ही राजासारखा राजा झाला नाही आणि होणारही नाही, यशवंत, किर्तीवंत, मूर्तिमंत, धनवंत, तर होतेच पण त्याच बरोबर मराठा तितुका मेळावावा आणि राष्ट्रधर्म वाढवावा या उक्ती प्रमाणे राजांनी आपलं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. राजांनी स्वराज्य केलं ते हातात काहीही भांडवल नसताना, राजांनी स्वराज्य उभं केलं आणि त्याच रूपांतर सुराज्यात करून देखील दाखवलं, असे काय नेमकं केलं राजांनी की जगाच्या पाठीवर राजांसारखं कुणालाच जमल नाही, राजानी रयतेच्या मनात राष्ट्रवाद पेरला, जगायच तर स्वराज्यासाठी आणि मरायच तर स्वराज्यासाठी, त्यासाठी राजांनी विचारांनी प्रेरित झालेली मावळे उभे केले, उभं केलं एक स्वप्न जे की फक्त इतरांना दिवास्वप्न वाटत होत , राजांनी जगण्याचा मंत्र दिला तसा जगण्याच तंत्र देखील दिलं, राजानी गडकोट किल्ले उभारताना ही मालमत्ता रयतेची आहे, यावर माझा काडीमात्र ही अधिकार नाही हे निक्षून पटऊन दिलं, प्रसंगी भावना म्यांन केल्याशिवाय स्वराज्य उभं राहतं नाही हे राजकारनाचं इंगित जगाला बहाल करून गेलं,जगाचा अर्थसंकल्प कसा असावा हे रायगडावरून 1674 साली जगाला दाखवून दिलं,जसा देश गहाण पडणार नाही तसा विचार आणि स्वाभिमान देखील गहाण पडणार नाही याची दक्षता घेतली.



स्वराज्य मजबूत करताना गडकोट किल्ले जसे मजबूत असले पाहिजे तसे ती सांभाळणारी मानस देखील प्रामाणिक आणि शब्दासाठी जीव देणारी असली पाहिजे तर आणि तरच राष्ट्र मजबुतीने उभे राहते हे विश्वाला पटवून दिले आणि म्हणून चारशे वर्षांनंतर देखील राजांनी सांगितलेली ध्येय धोरण राबाबली तर देश कधिही उपाशी मरणार नाही, म्हणून की काय जगाच्या पाठीवरती दोनच राजसत्ता आल्या पाहिजे असे लोकांना वाटते, पहिली रामराज्य दुसरी शिवशाही, तिसरे नाव अजून निर्माण झाले नाही……. वेध रायगडाचा (रवींद्र पाटील यांच्या सहकार्याने)(7887337332)