जानेवारीचा महिना होता, सन 1664, स्वराज्य उभं करण्याच काम नेटाने सुरू होते,एक एक किल्ला घेणे, मावळे जमविणे, आणि त्याना सैनिक प्रशिक्षण देणे, स्वराज्याच्या सीमा वाढवणे आणि त्या सुरक्षित करणे यावर शिवरायांचा भर होता, आणि एवढ सगळं दिव्य करायच म्हनजे पैसे तर लागणार, द्रव्य उभे कुठून करायचे असा प्रश्न राजासमोर ठाकला आणि राजांनी ठरवलं, औरंग्याचे नाक कापले पाहिजे,समुद्रकिनारी वसवलेली सुरत बेसुरत केली पाहिजे, काय नव्हते सुरतमध्ये,औरंग्याने सांभाळून ठेवलेली बरीचशी मोगली दौलत सुरत मध्ये लपवून ठेवली होती,ब्रिटिशांची मोठी बाजारपेठ होती, आंतरराष्ट्रीय दळणवळण महत्वाचे केंद्र होते सुरत,राजांनी ठरवलं, जनसामान्यांकडून लुटून जमा केलेली संपत्ती आपण स्वराज्यासाठी वापरली पाहिजे, आणि राजांनी सुरतेवर स्वारी केली,सावकारांचे वाडे काबीज करून सोने, चांदी, मोती, पोवळे, माणिक, हिरे, पाचू, गोमेदराज अशी नवरत्ने; नाणी, मोहरा, पुतळ्या, इभ्राम्या, सतराम्या, असफ्या, होन, नाणे नाना जातींचे, इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या. कापड भांडे तांब्याचे वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही. असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले.” या सावकारांत वीरजी वोरा, हाजी झहीद बेग, हाजी कासम सारख्या मातब्बर व्यापार्यांचा समावेश होता. मराठ्यांनी मोहनदास पारेख या ईस्ट इंडिया कंपनीच्या हस्तकाच्या वाड्यास हात लावला नाही. पारेख हा दानधर्मी व एतद्देशीयांना मदत करणारा असल्याने तो मृत असला तरी त्याची संपत्ती लुटली गेली नाही. इतरधर्मीय मिशनर्यांच्या मालमत्तेसही मराठ्यांनी अपाय केला नाही.मोहनदास पारखच्या घराला मावळ्यांनी संरक्षण दिले, रात्रभर सुरत खणली जात होती,लूट संपली मावळे राजांकडे निघाले, पाठोपाठ पारेखाची सौ देखील निघाली रात्रभर बैचेन होती बिचारी, तिला वाटले असेल आता आमचाही वाडा खणून नेतील पण झाले उलटे तिने राजासमोर येणे केले, राजांना विचारले ,माझ्या घराला संरक्षण का म्हणून ,राजे म्हणाले समाज आणि धर्म कार्यसाठी ज्याने नेहमी हातभार लावला त्यास इजा पोहोचवणे म्हणजे दुष्कर्म मोहनदासाने हयातभर धर्मकार्यासाठी मदत केली होती, आम्ही जो धर्मासाठी काम करतो त्याच्या नरडीचा घोट घेतो हे या मातीने पाहिले आणि साहिले आहे थोरलं राज सांगतात धर्माच रक्षण करणे आमचं काम आहे आम्ही आचरणात आणतो धर्मासाठी जो काम करेल त्याला दगडविटानी ठेवणे, खोट्या केसेस मध्ये साध्वीना अडकविणे यात आमची मास्टर की आहे


शिवराय स्वराज्याच्या विस्तार वाढवीत होते आणि संकटे काही कमी होत नव्हती प्रतापगडावरती अफजल चालून आला आणि एका घासात स्वराज्य संप वायचे असा बेत केला, राजांनी त्याला तेथेच संपविला खरे तर स्वराज्यावरचे पाहिले संकट होते ते त्यानंतर काही काळ संकटाची मालिका सुरू झाली होती आणि त्यातील एक मोठे संकट होते मिर्झाराजांचे, मिर्झा तसा हिंदू पण मुघलांचा ताबेदार होता,प्रचंड मुगल सैनिक घेऊन मिर्झाराजे जयसिंग स्वराज्यात उतरला होता मोठया प्रयासाने संभाजी राजांना ओलीस ठेवुन पुरंदर तह झाला होता, पुरंदरच्या तहात 23 किल्ले(कोंढाणासहित) देण्यात आले होते ते पुढील प्रमाणे अंकोला,कर्नाळा
कोंढाणा , कोहोज,खिरदुर्ग (सागरगड) तिकोना, तुंग नंगगड ,नरदुर्ग, पळसगड .किल्ले पुरन्दर, प्रबळगड , भण्डारगड,. मनरंज मानगड. मार्गगड, माहुलीगड ,रुद्रमाळ रोहिडा, लोहगड . वसन्तगड . विसापूर ,सोनगड दिल्यानंतर स्वराज्यात राहिलेले12 किल्ले . शिवाजी महाराजांच्या कडे ठेवण्यात आलेले 12 किल्ले पुढील प्रमाणे- किल्ले अनस्वरी,किल्ले पालगड (दापोलीजवळ),किल्ले भूरपगड (सुधागड,पालीजवळ),.किल्ले कावळा (वरंध घाट ),.किल्ले राजगड,किल्ले तोरणा,किल्ले लटकनगड,किल्ले रायपुर किल्ला (रायगड ),किल्ले तळागड,.किल्ले धोसळगड (घोसाळगड असावा )
,किल्ले महागड (?),.किल्ले ओखर्डा किल्ला (?)याच बरोबर जव्हार,पुणे,पाटण,इंदापूर,जुन्नर,जावळी,वेळापूर,बांदा,सांगली,गोवा हा भागही स्वराज्यात होता.पुरंदरचा तह म्हणजे मराठ्यांनि प्राणपणाने लढाया करून मिळवलेले किल्ले स्वाधीन करण्याचा हा वाईट प्रसंग परंतु त्यातून सावरून आग्र्याहून राजे परत आल्यानंतर त्त्यातून सावरून होता,लगेचच फक्त तीन वर्षात तहात गमावलेले सर्व किल्ले परत मिळवले, आणि त्यानंतर काही वर्षात छत्रपती झाले, राजांनी या तहात काय कमवल तर प्रचंड आणि प्रचंड अनुभव आणि सोबत बाळगली ती जिद्द . हातात आलेलं स्वराज्य गिळंकृत केलं होतं हिरव्या अजगरानी, राजांनी ते जिद्दीच्या बळावर परत मिळवलं नाही ते वाढवल देखील आणि सिंहासन धिष्टीत झाले, आम्ही सुद्धा बऱ्याचदा आयुष्यात सर्व काही पणास लावत असतो, पुन्हा पुन्हा पराभूत होत असतो तेव्हा नक्की म्हटलं पाहिजे थोरलं राज सांगून गेलं जिद्द बाळगा स्वराज्य उभं राहीलं
साभार (रवींद्र पाटील, इतिहास संशोधक) published by गौरव राणे 09/02/2023 8:22 PM (IST)