उमर तशी लहान होती पण समज मात्र जिजाऊंच्या संस्काराची, प्रसंग तसा बाका होता जिजाऊसमोर आणि शिवबा समोर, सुप्याच्या संभाजी मामा मोहित्याने काही तरी गहजब केला होता, उमाजी तिमांडे नावाच्या एका वतनदारांचं एक छोटंसं वतन परस्पर दुसऱ्या कुणाच्या नावावर लावण्यासाठी काही लाच घेतली होती, गैर वर्तुवणूक झाली होती,भ्रष्ट्राचार झाला होता, तो देखील एवढ्या 75 चा होनाचा रक्कम ती किती होती, उमाजी मोहिते मामाकडे तक्रार घेऊन गेले, मामांनी त्यांचे एकूण ते घेतले नाहीच उलट उमाजी च्या पाठवर कोरडे ओढले त्याला देश निकाला करून वतनाच्या बाहेर काढले, उमाजी निघाले शहाजीराजांकडे, बंगरुळात ,शहाजी राजांना इत्यंभूत वृत्तांत सांगितला. पाठीवरचे वळ दाखवले, आणि शहाजी राजांनी एक पत्र लिहिलं जिजाऊ मासाहेबांसाठी,पत्राचा आशय होता जेणे कारणे न्याय झाला पाहिजे उमाजी पत्र घेऊन लालमहाला वर आला, उमाजीने जिजाऊंच्या समोर ते पत्र सादर केले, मासाहेबांच्या कपाळावर चिंतेची लकेर उमटली, मोहिते मामा नाते तस नाजूक होत, व्यंकोजीराजांचे मामा, तुकाबाई साहेबांचे बंधू म्हणजे शहाजीराजांचे मेहुणे, जिजाऊ माँसाहेब विचार करीत होत्या तेवढ्यात शिवराय मसनदी वर आले, त्यांनी सगळा वृत्तांत समजून घेतला, निर्णय ठरला, योजना आखल्या गेली, सुप्याला सांगावा धाडला गेला, मामा सण आताच गेलाय पोस्त घ्यायला येतोय मामाला आनंद झाला.


स्वराज्याचा धनी येणार म्हणून आनंद होताच पण भाचा येणार याचा आनंद जास्त होता, वेळ ठरली, मुहूर्त ठरला, मोजके मावळे बरोबर घेतले, सुप्याकडे कूच केली, मामान शिवबाच्या स्वागताची तयारी चांगली केली होती, शिवबानं आपल्या मावळ्यांना चौकीचा ताबा घ्यायला लावला, आणि चौकीवरील मामाचे मावळे आपल्या बरोबर घेतले, मसनदी वर न जाता सरळ जेवायला बसले, जेवण झालं राजे म्हणाले मामा पोस्त देणार नव्ह, मामान विचार केला मागून मागून काय मागेल, गड कोट किल्ला मागेल, उंट हत्ती घोडा मागेल,जमिनीचा तुकडा मागेल, कापड चोपड ठाण मागेल देऊन टाकू, राजांनी हातावर पाणी घेतलं, मसनदीवर गेले म्हणाले मामा पोस्त म्हणून वतन मागतोय मसनदीला लाथ मारली म्हटले, भ्रष्टीचाराची जिंदगी जगविता थु तुमच्या जिंदगानिला राजांनी आपल्या मामाच वतन जप्त केले आणि भ्रष्ट्राचाराला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला आम्ही मात्र लेक-जावई-मुलगा-पुतण्या-बहीण-भाचे-काका-मामा-बायको-मेहुणी वाचवायला तयार आहेत, देश रसातळाला गेला तरी चालेल, राजांनी सांगितल लाच खोरी बंद झाल्याशिवाय राष्ट्र उभं रहाणार नाही आम्ही अर्थ उलटा घेतला लाचखोरी केल्या शिवाय आमच पोट भरणार नाही…. पुढील भागात काय घडलं असावं जाणून घेण्यासाठी वाचत राहा महान्यूज24×7 शिवाजी महाराज विशेष साभार (रवींद्र पाटील , जळगाव)