आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून दहा दिवस बंद राहणार आहे. लासलगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समिती उद्यापासून दिवाळीनिमित्त बंद राहणार आहेत. त्यामुळे आधीच परतीच्या पावसामुळे मेटाकुटीला आलेला शेतकऱ्याची कोंडी झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असुन कांदा पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर अशातच दिवाळीचा सण सुरू झाल्याने लासलगावला सलग दहा दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. लासलगाव कांदा बाजार समितीतून देशभरात कांद्याची निर्यात केली जाते. मात्र आता बाजार समिती दहा दिवस बंद राहणार असल्याने देशभरात परिणाम जाणवण्याची चिन्हे आहेत. परिणामी कांद्याचे किरकोळ बाजारातील दर आणि घसरण्याची शक्यता आहे.