भारताच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक (1983 World Cup) विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची भारतीय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालीय. तर, राजीव शुक्ला (Rajiv Shukla) बीसीआयच्या अध्यक्षपदी कायम आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदाची सुत्रे हाती घेतले. तसेच रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष ठरले आहेत. रॉजर बिन्नी यांच्याकडंच बीसीसीआयच्या अध्यक्षपदांची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं जवळपास निश्चित होतं. केवळ औपचारिकता म्हणून बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.

रॉजर बिन्नीची क्रिकेट कारकीर्द –
अष्टपैलू रॉजर बिन्नीनं 1979 ते 1987 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रॉजर बिन्नीनं 27 कसोटी सामन्यात 830 धावा केल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्यात 629 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. रॉजर बिन्नीनं कसोटीत 11 तर एकदिवसीय सामन्यात 12 झेल घेतले आहेत. रॉजर बिन्नीनं 27 कसोटीमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स मिळवल्या आहेत. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रॉजर बिन्नी महत्वाचा भाग होता. या विश्वचषकात रॉजर बिन्नीनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.