‘मुंबईत 337 किमी मेट्रोचे जाळे उभारणार’

मुंबई : राज्यातील सरकार बदललं आहे. शिवाय आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान आहे, झोपडपट्टी मुक्त मुंबईसह वाहतूक कोंडी मुक्त मुंबई करायची आहे. आता वेळ आल आहे की मुंबईला सर्वात बेस्ट सीटी बनवण्याची आहे.  2026 पर्यंत 337 किमीचे मेट्रोचे जाळे उभं करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  बई मेट्रोपोलिटन रिजन @ 2034 या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “म्हाडा, एसआरए वेगवेगळं आहे. इंटिग्रेडेड सिस्टिम नाही, मात्र येत्या काळात सर्व एकत्र करण्याचा विचार आहे. ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे घोडबंदरपर्यंत घेऊन जाणार आहोत.  2026 पर्यंत 337 किमीचे मेट्रोचे जाळे उभं करणार. मेट्रो 3 मध्ये काही अडचणी आल्या पण आम्ही त्या दूर केल्या आहेत. एमएमआर रिजनमध्ये अनेक बदल येत्या काही काळात बघायला मिळतील. सर्व मोठे प्रकल्प वेळेआधी पूर्ण होतील.  स्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात मुंबई आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.  त्यामुळे मुंबईतील येत्या काळात सर्व रस्ते कॉंक्रिटचे होणार, साडे चार हजार कोटींचे रस्ते नव्यानं बांधणार.”

“स्वच्छ महाराष्ट्र अभियान करत आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असं सांगितलं आहे. केंद्रातून कोणत्याही गोष्टीस लगेच परवानगी मिळते.  ज्या शहरांचे रस्ते चांगले आहेत, त्या शहरांचा विकास देखील चांगला होतो. त्यामुळे  आम्ही नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग बनवला असून लवकरच या महामार्गाचं उद्घाटन होणार आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!