बिकाजी फूड्स आणि ग्लोबल हेल्थची बाजारात दमदार एन्ट्री

शेअर बाजारात पडझड सुरू असताना दुसरीकडे आज दोन कंपन्यांची बाजारात लिस्टिंग झाली. मेदांता या ब्रॅण्ड अंतर्गत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारी ‘ग्लोबल हेल्थ’ (Global Health) कंपनी आणि खाद्यपदार्थ तयार करणारी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल (Bikaji Foods International) कंपनीने बुधवारी बाजारात दमदार एन्ट्री केली. शेअर बाजारात लिस्टिंग होताच या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. मुंबई शेअर बाजारात ग्लोबल हेल्थ 398.15 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर, बिकाजी फूड्स 321.15 रुपयांवर सूचीबद्ध झाला.

बिकाजी फूडसच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता.  एनएसईवर बिकाजी फूडस् 323 रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओ मिळालेल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 21 आणि 23 रुपयांचा नफा मिळाला. एनएसईवर बिकाजी फूड्सने सुरुवातीच्या टप्प्यात 334.70 रुपयांचा उच्चांक गाठला. बिकाजी फूड्सचा शेअर दर 11 टक्क्यांनी वधारला होता. 

ग्लोबल हेल्थनेदेखील गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ चांगलाच ‘हेल्दी’ केला. ग्लोबल हेल्थच्या शेअर दरात बीएसईवर 20 टक्क्यांनी वधारत 404.05 रुपयांवर पोहचला होता. आज या शेअरने 414.90 रुपयांचा उच्चांक गाठला.  

Published at : 16 Nov 2022 11:22 AM (IST)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!