पुणेकरांची करवसुली थांबवा-राज ठाकरे

पुणे महापालिकेकडून शहरातील नागरिकांना मिळकत कर वसुलीच्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. परंतु, ही कर वसुली थांबवण्यात यावी, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी या मागणीसाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

पुणे महापालिकेने अचानक शहरांत पूर्वलक्षी प्रभावाने मिळकत कर वसुलीच्या नोटिसा पुणेकरांना धाडल्या आहेत. 1970 च्या एका ठरावाप्रमाणे करपात्र मूल्यात कायद्यातील तरतुदीप्रमाणे मिळकत करात काही सूट दिली जात होती. 2019 ला ही सूट विखंडित करण्यात आली. मधल्या 48 वर्षांच्या काळात महालेखा परीक्षणात एकही आक्षेप आलेला नसताना ही सूट विखंडित का केली? तूर्तास या निर्णयाला स्थगिती दिलेली असली तरी, यावर कायम स्वरूपी निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा ही मागणी मनसेकडून मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.  

“वैद्यकीय क्षेत्रात क्रांती ठरेल असे एक मशीन घेऊन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  हेल्थ नोवो या कंपनीच्या हेल्थ एटीएम या रक्त चाचणी करणारी अत्याधुनिक मशीन आहे. 140 वेगवेगळ्या टेस्ट या मशीनद्वारे केल्या जातात आणि पाच ते दहा मिनिटात रिझल्ट माहित पडतो अशी ही मशीन आहे. महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे हे मशीन असून हें पोर्टेबल मशीन कुठे ही घेऊन जाऊ शकतो. याचे चार्जिंग सात ते आठ तास चालते. एक वेळी चार टेस्ट एकदम यात करता येतात अशी मशीन असल्याने याचा मोठा फायदा गाव खेड्यात ही होईल. त्यामुळे राज ठाकरे यांनी याची माहिती मुख्यमंत्री यांना दिली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!