महत्त्वाच्या ठिकाणी 157 नर्सिंग कॉलेजेस सुरु होणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा. मुले आणि युवकांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना. पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे उद्दिष्ट 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाईल. शेतीशी संबंधित स्टार्ट अप ला प्राधान्य दिले जाईल. 2014 पासून उभारण्यात आलेल्या सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये उभारण्यात येणार.


येत्या वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याची अपेक्षा. गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड. 50 नवी विमानतळ उभारणार. मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च. 44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच केंद्राचे स्क्रॅप धोरण जाहीर
जुन्या वाहनांसाठी स्क्रॅप धोरण जाहीर, जुन्या गाड्यांचे स्क्रॅप करण्यासाठी राज्यांनी केंद्राला सहकार्य करावे पंतप्रधान आवास योजनेचा खर्च 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक करण्यात येत आहे. येत्या तीन वर्षांत आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी 38 हजार 800 शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार. देशात 50 नवे विमानतळ उभारण्यात येणार बायोगॅसच्या उभारणीसाठी १० हजार कोटींची तरतूद
एकलव्य शाळेत ३८ हजार ८०० शिक्षकांची भरती करणार. गरीबांना मोफत अन्नधान्य योजनेची मुदत १ वर्ष वाढवली. रेल्वेसाठी २.४० लाख कोटींचे तरतूद अर्थसंकल्पात.