दिवाळीपूर्वी सामान्यांना दिलासा?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेक प्लसने तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर आता कच्च्या तेलाचे दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज देशातील इंधन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. इंधन कंपन्यांनी ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नसून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर (Petrol Diesel Price) आहेत. 

चीनकडून कमी झालेली कच्च्या तेलाची मागणी आणि मंदीचे सावट यामुळे कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर मागणी पुरवठ्यातील समतोल साधण्यासाठी ओपेकने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कच्च्या तेलाच्या दरातील घसरण थांबली. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 93.50 डॉलर प्रति बॅरल इतका आहे. तर, WTI क्रूड ऑईलचा दर 85.05 डॉलर प्रति डॉलर इतका आहे. 

वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवर असलेले कर कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मे महिन्यात केंद्र सरकारने उत्पाद शुल्कात कपात केल्याने पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले होते. त्यानंतर जुलै महिन्यात सरकारने कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे पाच रुपये आणि तीन रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. 

राज्यातील प्रमुख शहरात दर काय?

> नागपूर: पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे: पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
> कोल्हापूर: पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
>औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 

देशातील प्रमुख महानगरात इंधन दर काय?

> दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
> कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
> चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
> मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!