पुणे प्रतिनिधी: दिवाळीच्या काळात पुण्यातील अनेत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. पुढील 10 दिवस पुणेकरांकडून कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केली आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस पुणेकरांची दंडापासून सुटका होणार आहे.


मागील काही दिवस झाले पुण्यात दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. मध्यवर्ती परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा बघायला मिळत होत्या. त्यामुळे अनेक पुणेकर वाहतुकीचे नियम तोडून मार्ग काढत होते. पोलिसांनाही या गर्दीवर नियंत्रण ठेवणं आणि कारवाई करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे 10 दिवस कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.