टी20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) फायनलचा सामना इंग्लंडने 5 विकेट्सनी जिंकत इतिहास रचला आहे. दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर इंग्लंडनं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेलेला हा टी20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना एक लो स्कोरिंग मॅच असूनही चुरशीची असल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह 2010 नंतर पुन्हा एकदा इंग्लंडनं टी20 विश्वचषक जिंकला आहे.

