पुणे:- गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीच प्रकरण हे राज्यभर गाजत आहे.टीईटी पेपर फुटी प्रकरण असेल किंवा आरोग्य भरती पेपर फुटीच प्रकरण असेल पुणे पोलीस आता साऱ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणत आरोपींना अटक करताना दिसत आहेत.टीईटी 2018 साली जी परीक्षा झाली होती.त्यात निकालात फेरफार तसेच अपात्र केलेल्या परीक्षार्थींना पात्र केल्याच्या घटना घडल्या होत्या.याचा तपास पोलिसांकडून झाला असून याबाबत 2625 पानांचं चार्ट शीट कोर्टात दाखल करण्यात आल आहे.


2018 च्या टीईटी पेपर फुटी प्रकरणात 12 आरोपींवर चार्ट शीट दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी इतर 16 आरोपींच्या तपासाची परवानगी घेण्यात आली असून त्यांचा तपास करण्यात येणार आहे.2018 मध्ये टीईटी पेपरफुटी प्रकरणात 1701 विद्यार्थी हे अपात्र होते ते पात्र करण्यात आले आहे.त्यातील 817 विद्यार्थीना मूळ निकालात मार्क वाढवून पास करण्यात आलं होतं आणि 884 विद्यार्थ्यांना महाटीईटी परीक्षेत पास करण्यात आलं आहे.
ज्या परिक्षार्थींनी एजंट ला पैसे देऊन पास झाले आहे.अश्या लोकांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अस आवाहन देखील यावेळी अजय वाघमारे यांनी केलं.

