आर्थिक मंदीच्या भीतीने 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा वाढू शकतो. पण अमेरिकेचा जगतीक्व अर्थव्यवस्थेतला वाटा कमी होण्याची शक्यता आहे. IMF च्या मते, जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांवर मंदीचा धोका आहे.

2023 हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी कठीण जाणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये मंदीचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, अमेरिका, युरोप आणि चीनमधील आर्थिक घसरण होत आहे. 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील अमेरिकेचा वाटा कमी होणार असल्याचेही IMFचे आकडे दर्शवत आहेत.

या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा वाढेल. 2022 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचे ठरले आहे, कारण जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताने स्थान निर्माण केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये भारताचा जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा 3.6 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

2000 मध्ये भारताचा वाटा 1.4 टक्के होता. याच काळात जागतिक अर्थव्यवस्थेतील अमेरिकेचा वाटा 2000 सालच्या तुलनेत कमी होईल. सन 2000 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा सहभाग 30.1 टक्के होता. यंदा ते 24.7 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते.

भारताने टॉप-5 मध्ये मिळवले स्थान

गेल्या वर्षी 2022 मध्ये, जागतिक अर्थव्यवस्था 100 ट्रिलियन डॉलर्स ओलांडून 101.6 ट्रिलियनवर पोहोचली. विशेष म्हणजे या वर्षी भारताने ब्रिटनला मागे टाकत जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

IMF च्या मते, 2022 मध्ये भारताचा GDP 3,468.6 अब्ज डॉलर होता. 2023 मध्ये सर्व आव्हाने असूनही, भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेची घसरण, वाढत्या महागाईचा दबाव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेसारख्या मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरात झालेली वाढ यामुळे दबाव वाढला आहे.

IMF चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ  पियरे ओलिवियर गौरिनचास यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये सांगितले की, भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

अशा परिस्थितीत भारताचा 6.8 टक्के किंवा 6.1 टक्के दराने विकास होणे ही मोठी गोष्ट आहे. सध्याचे वातावरण पाहता भारताच्या आर्थिक विकास दराचा हा वेग महत्वाचा आहे.

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे की नवीन वर्ष कठीण असणार आहे. कारण अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीन या तिन्ही मोठ्या अर्थव्यवस्था एकत्रितपणे मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

भारताची जीडीपी वाढ

आर्थिक मंदीच्या भीतीने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत  6.3 टक्के दराने वाढली. म्हणजेच दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.3 टक्के होता.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जून-2022 मध्ये जीडीपीचा आकडा 13.5 टक्के होता. त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत, जीडीपीची वाढ 8.4 टक्के होती. असे RBI ची आकडेवारी सांगते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!