श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने चैतन्य कबीर महाराज यांनी कार्तिकादिशीचा आणि आळंदीचे महत्त्व विशद केले ते सांगतात की;
ज्ञानेश्वर माऊलींनी शोषणरहित समाजाचा पाया येथे बांधला. माणूस येथे भावना असलेली ज्ञानेश्वर माऊली यांनी जोजेवांच्या तोते लाभो प्राणी जात असे म्हणून या विश्वातल्या सर्व प्राणीमात्रांच्या साठी त्यांना जे जे हवं तेथे मिळो अशी देवाकडे प्रार्थना करून पसायदान म्हटले होते.
अशा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी येथे सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात माऊलींनी संजीवन समाधी घेतली. या सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास रंजक आहे. या मंदिराचे पौरोहित्य ज्ञानेश्वर माऊलींची आई म्हणजेच रुक्मिणी देवी यांचे वडील हे करत होते. त्यांची आणि विठ्ठल पंतांची भेट याच मंदिरात झाली. आणि येथेच रुक्मिणी देवी आणि विठ्ठल पंतांचा विवाह देखील झाला.


ज्यावेळी विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यास्त आश्रमात प्रवेश केला होता तेव्हा रुक्मिणीदेवींनी या मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजेच अजाण वृक्षाला स्ववा लक्ष प्रदक्षिणा केल्या. आणि विठ्ठल पंत पुन्हा गृहस्थाश्रमात आले. गृहस्थाश्रमात स्वीकार केल्यावर ते त्यांना ही निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई चार मुले झाली. पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवन समाधी देखील याच सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात सर्व संतांच्या मांडयाळीत सर्वांना साक्षी ठेवून त्यांनी समाधी घेतली.
संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेणे अगोदर आषाढी एकादशीला पंढरपूरला आपल्या तिन्ही भावंडांसोबत विठ्ठल रुक्माई ला संजीवन समाधी सोहळ्याला बोलवण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत सर्व संतांची मांदळी होती. यावरती भगवान विठ्ठल आणि प्रसन्न होऊन संत ज्ञानेश्वरांना आशीर्वाद दिला की जशी माझी पंढरपूरची कार्तिकी एकादशीची यात्रा असते तसेच तुझी देखील कार्तिकी कृष्णपक्ष एकादशीची यात्रा होईल.
संत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याला खुद्द भगवान विठ्ठल रुक्मिणी देवी, संत नामदेव आणि अलंकापुरी म्हणजे आळंदीचे सर्व भक्तजन उपस्थित होते. त्यांनी येथे सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये विवरामध्ये संजीवन समाधी घेतली. संत नामदेव आणि यांच्या कुटुंबाने या मंदिराची आणि समाधीची सर्व निगा राखण्याचे काम केले होते.
यावेळी संत नामदेव यांनी लिहिले की
||उठवला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवरची||
म्हणजे सिद्धेश्वर मंदिराचा जो नंदी आहे तो जागेवरून हलवला आणि तिथून संजीवनी समाधीच्या विवराचे मुख उघडले.
आजही सर्व भक्तजनांना श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आशीर्वाद देत असतात. आजही ते 725 वर्षा अधिक काळापासून सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण करतात.