पुणे राखायचं असेल तर कसबापेठ मतदारसंघ जिंकलाच पाहिजे. कसबापेठ म्हणजेच पुण्याची सुवर्णसत्ता हे राजकीय गणित नेहमी जुळून येतात. याच कसबापेठ मतदारसंघाची पोटनिवडणूक सध्या लागली आहे. २०१९ मध्ये कसबापेठ मतदारसंघ मधून पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक या आमदार झाल्या मात्र त्या महापौर असल्यापासूनच त्यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. त्याच आजाराने त्यांचा मृत्यू डिसेंबर 2022 मध्ये झाला. आणि कसब्यातील पोटनिवडणूक लागली .


कसबापेठ पोट निवडणूक सर्व पक्षांसाठी महत्त्वाची का?
मोठे मोठे नेते या छोटा असणाऱ्या मतदारसंघासाठी प्रचारात भाग का घेत आहेत?
तसेच जातीय राजकारण नेमकं काय?
स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक नोव्हेंबर२०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यात. मुक्ता टिळक आमदार होण्याआधी पुण्याच्या (पुणे महानगरपालिका) महापौर देखील होत्या पुण्याच्या जनतेने भाजपला २०१७ च्या पुणे मनपा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यावेळी भाजपने मुक्ता टिळक यांना महापौर केले. मात्र मुक्ता टिळक महापौर असताना त्यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. असे असताना देखील त्यांना भारतीय जनता पार्टीने सहानुभूती दाखवत देखील आमदारकीचे तिकीट दिलं. कारण कसबापेठ मतदार संघात ब्राम्हण मतदार हा जास्त होता. आणि गिरीश बापट यांना पक्षाने आमदारकीसाठी उमेदवारी नकरल्याने सक्षम ब्राम्हण चेहरा म्हणून देखील मुक्ता टिळक यांना उमेदवारी देत निवडून आणलं. त्यावेळी केंद्रातील मोदी सरकारमुळे राज्यात देखील भाजप सत्तेत येणार हे निश्चित होतं. याचाच फायदा मुक्ता टिळक यांना झाला आणि त्या आमदार म्हणून निवडून आल्यात मात्र मुक्ता टिळक यांना असलेल्या कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामुळे त्यांना आपल्या मतदारसंघात कोणतेही काम करता आले नाही. परिणामी मतदारसंघातील नागरिकांचा रोष वाढत होता. तसेच तत्कालीन आमदार विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी आपल्या मतदार संघात जनतेशी नाळ जोडून ठेवली होती. ती नाळ मात्र मुक्ता टिळक यांना बांधता आली नाही. शिवाय आपल्याच कार्यकर्त्यांची काम देखील होत नव्हती यामुळे स्थानिक कार्यकर्ते देखील नाराज होते. त्यामुळे भाजपला मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर एक सक्षम चेहरा कसबा मतदार संघाला देणे गरजेचे ठरते. यासाठी भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली गेली. हेमंत रासने हे स्थायी समिती सभापतीचे चार वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. शिवाय त्यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे. आणि त्यांनी कसबा मतदारसंघांमध्ये कामे देखील अनेक प्रमाणात केली आहे. त्यामुळे याचा फायदा भाजपला होऊ शकतो. मात्र हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये दोन गट पडल्याचेही दिसून आले. एक ब्राह्मण तर दुसरा हेमंत रासने यांना मानणारा याच कारण अस की कसबा पेठ मतदार संघात ब्राम्हण उमेदवार होता. शिवाय मुक्ता टिळक यांच निधन झाल्यावर भाजपकडून टिळक परिवाराला उमेदवारी नाकारत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. शिवाय खासदार गिरीश बापट देखील आजारी असल्याने प्रचारात सहभागी होऊ शकत नाही आहेत. तरीदेखील बापट यांना भाजपने प्रचारात एक वेळ उतरले मात्र भाजपच्या या प्रकारामुळे मतदार नाराज झाल्याचं दिसून येतय. तर महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसने उमेदवारी दिलेले रवींद्र धनगेकर यांनाही मोठा जनाधार असल्याचा दिसून येतो. त्यामुळे भाजपला कसबा मतदार संघ राखणं कठीण होऊ शकत. शिवाय भाजपला मतांचा मोठा फटका देखील बसू शकतो त्यात प्रामुख्याने ब्राह्मण समाजाचा मतांचा फटका मोठ्या प्रमाणात भाजपला बसू शकतो. याचा भाजपला अंदाज असल्याने आणि आगामी मनपा निवडणूक तसेच विधानसभा निवडणूक मध्ये पुण्यात भाजपला आपला स्थान राखायचं असेल तर कसबा मतदारसंघ हा महत्त्वाचा आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीने अमित शहा आणि इतर मोठ्या नेत्यांना प्रचारात उतरवलेले दिसून येत. तसेच कसबापेठ मतदार संघात महाविकास आघाडी तर्फे रवींद्र धनगेकर यांच्या प्रचारसाठी खुद्द शरद पवार मैदानात आहेत. कसबापेठ मतदारसंघ ताब्यात आल्यास पुढील निवडणुकीत त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि महानगरपालिका देखील ताब्यात राहू शकते. त्यामुळेच कसबापेठ मतदारसंघ जिंकण सर्व राजकीय पक्षांना महत्वाचा आहे. मतदानाचा विचार केला तर कसबापेठ मतदार संघात महिला मतदार १ लाख ३६ हजार आहेत तर पुरुष मतदार हा १ लाख ३९ हजारच्या वर आहे. कसबापेठ मतदार संघात २०१४ च्या मतदारानुसार ब्राह्मण मतदार हा चाळीस हजार आहे. तर मराठा मतदार हा ६५ हजार आहे.
शिवाय पुण्यातील कसब्याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे वसवतांना मुहूर्तमेढ ही कसब्यातून केली असल्याचे पुरावे इतिहास देतो. ज्यामुळे कसब्यात ब्राह्मणांशिवाय मराठा, माळी आणि इतर समाज देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येतो त्यामुळे कसबापेठ मतदारसंघ नेमकं कोण जिंकणार हे बघावे लागेल.