गौरव राणे, देवाची आळंदी, पुणे IST 10:18PM 19/11/2022
आषाढी कार्तिकी भक्तजन येती असं म्हणत गेला अनेक शतकापासून पंढरपूर आणि आळंदीची यात्रा पिढ्यानपिढ्या अनेक वारकरी करत आहेत आज आपण आषाढी कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी येथील यात्रेचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेऊया याबाबत भाऊ महाराज फुरसुंगीकर सांगतात की;
725 वर्षापासून ही आळंदीची यात्रा भरते आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक एकादशीला संजीवन समाधी घेतली होती यामुळेच भगवंताने म्हणजे विठ्ठलाने श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना आशीर्वाद दिला होता की; जशी माझी कार्तिकीची एकादशी साजरी केली जाते तसेच तुझी देखील कार्तिक कृष्ण एकादशी ही साजरी केली जाईल.
संत ज्ञानेश्वरांच्या कार्तिकी एकादशीच्या यात्रेचा संदर्भ म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना अनुग्रह झाल्यावर त्यांनी सर्वांना उद्देशून म्हटले होते की;
||चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू; होतील संतांच्या भेटी सांगू सुखाचिया गोष्टी!
जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाक!
असे संत तुकारामाने आवाहन केल्यावर सर्व जनमानसावरती त्याचा मोठा प्रभाव पडला.
ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा हा श्री गुरु हैबत बाबा यांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू होतो.
कार्तिकी अष्टमीला संजीव समाधी सोहळ्याला सुरुवात होते. ते कार्तिक अमावस्येपर्यंत हा सोहळा असतो. कार्तिकी एकादशीला मोठे महत्त्व असते. यासोबतच कार्तिक अमावस्येला महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होते. आणि संजीवनी समाधी सोहळ्याची सांगत होते.
याबाबत स्वतः भगवंताने सांगितलेले आहे की;
यात्रे अलंकापुरी येतील ते आवडती विठ्ठला!
जो करील याची यात्रा तो तारीला सगळं गोत्रा!
हा भगवंताने दिलेला संदेश सर्व संत मांदियाळीने सर्व जनमानसात रुजवला.
यामुळे आळंदीला कार्तिकी एकादशीनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवनी समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

