‘उद्धव ठाकरेंची पोटदुखी वेगळी; सत्ता गेल्याचं दुःख’

“उद्धव ठाकरेंची पोटदुखी वेगळी; सत्ता गेल्याचं त्यांना दुःख; भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला?”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे सॅम्पल असा उल्लेख करत केंद्र सरकारने ते परत न्यावे असे सांगत महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला? अशी विचारणा त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे वागावे इतकीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कधीही महाराष्ट्र सहन करणार नाहीय. राज्यपाल यांच्या बद्दलची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्राला कळवली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची पोटदुखी वेगळी आहे. सत्ता गेल्याच त्यांना दुःखं आहे. महाराष्ट्राची जनता ठरवेल की ताकद कमी केली की वाढवली. गेल्या सरकारपेक्षा आम्ही राज्याची ताकद वाढवली आहे. एका क्लिकवर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांना विचाले असता ते म्हणाले की, तुमची सत्ता असताना विधानसभेत सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा प्रस्ताव दिला नाही? इतके तुम्ही लाचार झाला होता, दुर्मिळ झाला होता.

केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून जोरदार टीका केली. तुमचे चिरंजीव बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालत असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी महाराष्ट्र दुर्बल झाला हे दिसले नाही का? आमचे सरकार येऊन चार महिने झाले नाही तोवर टीका करायची. तुमचे उद्योग जनतेला माहीत आहे, बोलण्यासाठी कुणी नाही म्हणून माणसं आयात करावी लागतात. आपण विक झाले म्हणून दुसऱ्याला विक म्हणता, अनेक पक्षांचे आधार घेत असल्याचे केसरकर म्हणाले.

www.mahanews24x7.com
Mobile: 7507040009
E-mail: hr@mahanews24x7.com
Facebook : Mahanews24x7
Instagram: Mahanews24x7
Tweeter:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!