ईडीची रेझरपेसह इतर कंपन्यांवर छापेमारी 

नवी दिल्ली: ईडीने आज चायनिज लोन अॅप (Chinese Loan App) संबंधित पेमेंट गेटवे असलेल्या रेजरपे (Razorpay) आणि इतर कंपन्यावर छापेमारी करत 78 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. या कंपन्यांचे व्यवस्थापन चीनी नागरिकांकडून केलं जातं असल्याचं ईडीने म्हटलं आहे. चायनिज लोन अॅप प्रकरणी बंगळुरू पोलिसांच्या सायबर सेलमध्ये अनेक संस्था आणि लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ईडीने शुक्रवारी बंगळुरूमधील पाच ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती आहे. ईडीने या प्रकरणी ज्या कंपन्यावर छापेमारी केली आहे त्या कंपन्यांचे व्यवस्थापन चीनी नागरिकांकडून केलं जात असून त्यामध्ये अनेक प्रकारची आर्थिक अफरातफर केली जात असल्याचं समोर आलं आहे. बोगस कागदपत्रांच्या आणि आयडी खात्यांच्या माध्यमातून ही अफरातफर केली जात आहे असं ईडीने म्हटलं आहे. ईडीने ही कारवाई मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये (Prevention of Money Laundering Act-PMLA), 2002 केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!