आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका (MLA Sanjay Shirsat Heart Attack)आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

संजय शिरसाठ यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. शिरसाट यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात येणार आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिरसाट यांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यातच त्यांनी सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!