सन्मान आपल्या युगपुरुषाचा, ठेवू या आदर्श शिवरायांचा! अशी अर्थसंकल्पाची सुरवात करत देवेंद्र फडणवीस  यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे 350 व्या वर्षाच्या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये, आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजीमहाराज संकल्पना उद्यान 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने यासाठी 250 कोटी, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये अशीघोषणा केली.

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्पाची ‘पंचामृत’ ध्येय

1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

5) पर्यावरणपूरक विकास

शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा

– नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मिळणार

– 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ, 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

– महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा, 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

– राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषि विकास अभियान राबविणार

– तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना

– महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा

– मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर देणारयासाठी 1000 कोटी

– अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ

शेतकर्‍यांना थेट रोखीने आर्थिक मदत!

– विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत

– अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात

– प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार

– कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन

कोकणाला काय ?

– 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड

– काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव

– उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र

– कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना

– 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद

विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र

– नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार

– या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार

– नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र 20 कोटी रुपये तरतूद

धनगर समाजाला 1000 कोटी रुपये

– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करून 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज

– मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटींचा मत्स्यविकास कोष, विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा, मासेमार बांधवांसाठीकेंद्राच्या मदतीने 5 लाखांचा विमा

– मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा

– प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप

– प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी

– उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत

सिंचन / पाणी असे असतील नदीजोड प्रकल्प

– दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून

– नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार

– मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार

– मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ

– वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ

जनजीवन मिशन

– 17.72 लाख कुटुंबांना नळजोडणी, सुमारे 20,000 कोटी रुपये

– 1656 एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प, 10,000 कि.मी.च्या मलजलवाहिनी

– 4.55 कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया, 22 नागरी संस्थांना 124 यांत्रिक रस्तासफाई वाहने

– ग्रामीण भागात 15,146 घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे

लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

– मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात

– पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ, जन्मानंतर मुलीला 5000 रुपये

– पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये, अकरावीत 8000 रुपये आणि मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

सारे काही महिलांसाठी

– राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत

– चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार, मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना

– महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

– माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार

आशा स्वयंसेविकाअंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

– आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

– गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये

– अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

– मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये

– अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये

नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे

– शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती

– अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणिउज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना

– या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा, या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माणकरणार

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत 5 लाखांपर्यंत उपचार

– महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये, नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेशकरणार

– मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत, राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य

– संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

– राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार. प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान

नवीन महामंडळांची स्थापना

– असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ

– लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ

– गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ

– रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ

– वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ

– ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत

– प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार

आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी

– 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार

– अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती

अल्पसंख्यकांसाठी

– अल्पसंख्यक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यात 3000 बचतगटांची निर्मिती

– उच्च शिक्षण घेणार्‍यांना शिष्यवृत्ती: 25,000 वरुन 50,000 रुपये

सर्वांसाठी घरे, 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना

– प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे (2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)

– रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)

– शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये

– यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी (25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)

– इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी रुपये (यायोजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार/3600 कोटी रुपये)

मुंबईतील नवीन मेट्रो प्रकल्प

– मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला

– मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी

– मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये

– मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये

विमानतळांचा विकास

– शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी

– छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी

– नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार

– पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

– नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी

– बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे

विद्यार्थ्यांना भरीव शिष्यवृत्तीगणवेशही मोफत

– 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये

– 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये

– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

शिक्षणसेवकांच्या मानधनात सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

– प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये

– माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये

– उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

– पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

पर्यटनाला चालना

– प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण

– पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास

– 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार

– राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवसमहोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश

स्मारके

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार

– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी

– भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये

– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये

– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये

– स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये

– विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी

– स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये

धार्मिक क्षेत्रांचा विकास

– श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : 500 कोटी रुपये

– भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी: 300 कोटी रुपये

– श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : 50 कोटी रुपये

– श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : 25 कोटी रुपये

– श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठीभरीव निधी

– प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी

– गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : 25 कोटी रुपये

– श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: 6 कोटी रुपये

– श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : 25 कोटी रुपये

बोलतो मराठी, वाचतो मराठी…

– श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार

– विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे

– मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे

– सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये

– राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये

– दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये

– कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना

– विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये

– स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा

By Gaurav N. Rane

Anchor/ Producer at JAI MAHARASHTRA NEWS in MUMBAI From April2022 to September2022 Responsibility: ➢ Produced News. ➢ Published content for electronic media. ➢ Wrote effective headlines & wrote cover stories for Jai Maharashtra news and digital. ➢ Handling the other staff for making news more knowledgeable. MOJO Reporter at JAI MAHARASHTRA NEWS in PUNE From January2022 to March2022 Responsibility: Prepared, submitted press material that was precise and effectively conveyed the message. ➢ Produced editorial content. ➢ Taking video content for electronic media. ➢ Wrote effective headlines & wrote cover stories for Jai Maharashtra digital. ➢ Presenting the actual report in case of live telecast. ➢ Taking the soft stories as special news for JM Special program. Sr. Reporter Mahanews24*7 From Oct- 2018 to till 2/1/22. Responsibility: Prepared, submitted press material that was precise and effectively conveyed the message. ➢ Produced editorial content. ➢ Published content for electronic media. ➢ Wrote effective headlines & wrote cover stories for newspapers. ➢ Handling the other staff for making news more knowledgeable. ➢ Presenting the actual report in case of live telecast. ➢ Taking the interview of special guests in front of camera. ➢ Provided technical assistance to Assignment Editor, news anchor and field crews, as needed. Video journalist & Reporter EBM News, Jalgaon. From Jan 2016 to Oct 2018 Responsibility: ➢ Obtained and followed up on news and event leads, from different sources ➢ Edited, revised and assessed video scripts and video-recordings of news stories, to ensure delivery of high quality broadcasts. ➢ Maintained timely production, review and delivery of all newscasts and video contents. ➢ Created excellent content for press releases, newsletters. ➢ Developed and promoted story approaches that attracted viewers. Video journalist E Bright Media News web portal From May-2014 to Jan-2016 Responsibility: ➢ Conducted research and interviews to validate reliability of facts related to news leads and subsequent stories. ➢ Assisted with development of news ideas, contacts and resources, to produce interesting news stories, in a video format. ➢ Created, improved and presented comprehensible and highly interesting newscasts, video scripts, show-teases and other related video broadcasts. Reporter Dainik Janshakti, Jalgaon From November-2013 to May-2014 Responsibilities: ➢ Covering a range of areas for local dailies & presenting them in front of cameras. ➢ Taking the interview of special guests in front of camera. ➢ Managing the documents of report. ➢ Understanding the situation and handling all jobs related duties.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!