राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात 21 ऑक्टोबर रोजी सीबीआय युक्तिवाद करणार आहे. ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानतंर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातही जामीन मिळावा अशी विनंती अनिल देशमुखांनी केली आहे. त्यावर आजपासून सुनावणी सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार एका आठवड्यात या जामीन अर्जावर निर्णय देण्यात यावा अशी विनंती अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून करण्यात आली. जर सरकारी पक्ष सहकार्य करणार नसेल तर हे कसं शक्य होणार? असा सवालही देशमुखांच्या वकिलांनी केला. तसेच सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यास चालढकल सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

