अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण


प्रतिनिधी गौरव राणे

पुण्यातील धानोरी भागात कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना आज घडली.
कारवाईसाठी गेलेल्या पथकावर स्थानिकांनी हल्ला करत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या सर्व प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होण्याचे काम चालू आहे.पालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून धानोरीत दुपारी दीडच्या सुमारास संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये पदपथावरील, पथारी व्यावसायिक विक्रेत्यांची अतिक्रमणे ताब्यात घेण्यापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इमारतींना लागून केलेल्या पत्राशेड व इतर तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांवरही जेसीबी यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.याचवेळी काही जणांनी जेसीबीवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पालिका अधिकारी जागेवरून दूर निघून गेले, तर जेसीबी चालकही जेसीबी सोडून निघून गेला. पालिकेच्या कारवाईत झालेली नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय जेसीबी यंत्राचा ताबा सोडणार नसल्याचा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. दरम्यान या घटनेबाबत पालिकेच्या वतीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई होईल असं सांगितलं होतं. या प्रमाणे शहरात अनेक ठिकाणी कारवाई सुरु देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!